चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि. ३/१२/२०२२
त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली (मो.)तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे बाहेरगावावरून ये जा करणाऱ्या सावित्रीच्या लेकीला मानव विकास मिशन अंतर्गत एकूण 12 सायकलचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी गावातील सरपंच माननीय सुधीर पाटील शिवणकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय युवराज भाऊ निखाडे आणि गावातील पोलीस पाटील माननीय दिगंबर पाटील चौधरी गावातील प्रतिष्ठित नागरिक सदानंद पाटील जवादे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेश ढुमने सर,विनायक वासेकर सर,ज्ञानेश्वर शिंपी सर, सचिन चलकलवार सर, अभिजीत साना सर हरिष गेडाम सर , रमेश सडमेक सर, मंगल गुरनुले, मंगेश हुमने व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या