चामोर्शी, दि. ३/१२/२०२२
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देऊन जीवित व वित्तीय हानीचा प्रभाव कमी करण्यासाठी शाळा स्तरावर शोध बचाव पथक कशा पद्धतीने कामगिरी करू शकेल याबाबत प्रात्यक्षिक 2 डिसेंबर रोजी स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे देण्यात आले.यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील 558 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य आर.एस. ताराम, रेखा इंडिया या संस्थेचे प्रकल्प प्रमुख विपुल नकुम, होमगार्ड जिल्हा समादेशक केंद्रनायक प्रमोद रामेरवार ,सामग्री प्रबंधन सुभेदार रवींद्र सहारे प्रा. रमेश बारसागडे प्रा.मुकेश पुरोहित, प्रा. गेडाम डॉ. पंकज नरुले, प्रा.स्वप्निल खेवले ,प्रा. नाझीम शेख, प्रामुख्याने उपस्थित होते.शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रात्यक्षिकाद्वारे देण्यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते .भूकंप काळात किंवा शाळेला आग लागल्यास, पूर परिस्थितीच्या काळात आपला बचाव कसा करावा, शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना ,आपत्तीच्या प्रसंगी नगर पंचायतीचे सहकार्य, यांची प्रात्यक्षिक फायर दि ग्रेट आणि ॲम्बुलन्स च्या मदतीने घेण्यात आले .विद्यार्थ्यांना शरीराला जर इजा झाली तर त्यासाठी उपाय योजना इत्यादी बाबत या कार्यशाळेत प्रात्यक्षिकद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा. उराडे , मडावी ,प्रा.रामने, प्रा. कुकुटकर, प्रा. तरेवर ,प्रा. डायकी, प्रा.मडावी,प्रा.रामटेके ,प्रा. चापडे प्रा.चव्हाण अजय पडवालयांनी सहकार्य केले.