शालेय जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विदयालय, जोगिसाखरांचा संघ अजिंक्य.

गडचिरोली  जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

जोगीसाखरा, दि. ५/१२/२०२२

गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १९ वर्षे मुले वयोगटामध्ये जवाहरलाल नेहरू विदयालय, तथा उच्च माध्यमिक विदयालय, जोगिसाखरा ता. आरमोरी जि. गडचिरोली. संघाने अंतिम सामन्यामध्ये देसाइगन्ज तालुका संघ आदर्श हायस्कूल वडसा संघावर ६ गाडी राखून विजय मिळविला या विजयाबद्दल गुरुनानक सोशियल ट्रस्ट देसाइगन्ज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हिरालाल जेठामाल मोटवानी, सचिव किसनभाऊ हिरा मोटवानी, मंडळाचे सर्व सदस्य विद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्णा खरकाटे सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद विद्यालायाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक महेश उरकुडे, अजय सपाटे प्रेमानंद मेश्राम, आकाश राऊत यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. सदर विजयी संघात विलास मंडळ कर्णधार, सुजित मैंद, कुणाल खरकाटे, साजन थेरकर, अतुल मोहुर्ले, हेमंत चौधरी, तन्मय सरकार, सागर मंडळ, विक्रम सरकार, तन्मय कांबळी, श्रेयश भरें, तन्मय सरकार, शैलेश गुरनुले यांचा समावेश होता.