चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि.५/१२/२०२२
मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पि.जी.उंदिरवाडे, सचिव डि.डि.मेश्राम, तसेच पदाधिकारी के.के.तावाडे,व मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम, यांच्या हस्ते सायकलचे वितरण
चामोर्शी तालुक्यातील येनापुर जवळील डॉ.बि.आर.आंबेडकर विघालय वायगाव येथील बाहेर गाव वरुन येणा-या विद्यार्थींना
शासनाच्या मानव विकास मिशन व जि.प.शिक्षण विभाग माध्यमीक अंतर्गत दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी सोमवारला सावित्रीबाई फुले यांच्या लेकीना, १५ विद्यार्थीनिना सायकलचे वाटप मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पि.जी.उंदिरवाडे, सचिव डि.डि.मेश्राम, संस्था सदस्य के.के.तावाडे, मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य विनोद मडावी,ग्रा.प.सदस्य सुनील गोवर्धन,पालक बबन तोडसाम, मनोज रतनपुरे , अशोक लाकडे, यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम,शिक्षक संजय वाढई, एस.जी.गजभिये, जे.एस.बांबोळे, आर.डी.उराडे, एस.एम.कोचे, एस.बी.आलेवार,के.एल. बन्सोड, डि.एच.वालदे, व शिक्षकेतर कर्मचारी लिपिक पि.के.उंदिरवाडे, शिपाई आर.एस.वाटे,यादव पुच्छलवार, उपस्थित होते.
विशेष म्हणजे बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या गरीब व गरजू मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मानव विकास योजने अंतर्गत मुलीसाठी मोफत सायकलीचे वाटप करून ज्यास्तीत ज्यास्त मुलींनी शिक्षण घेऊन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासने हे पाऊल उचलले आहे . एकंदरीत परीसरातील कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहु नये असे सुर मान्यवरानी काढले. मुलींना मोफत सायकल मिळाल्याने आनंद व्यक्त करून पालकांनी व परिसरातील नागरिकांनी समाधन व्यक्त केलेले आहे.