ब्रह्मपुरी येथील गुंठेवारीच्या प्लॉट धारकांना न्याय मिळण्यासाठी मा.ना.सुधीरभाऊंना प्लॉटधारकांचे निवेदन

ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

ब्रम्हपुरी दि. ५/१२/२०२२

दि. ३ डिसेंबर २०२२ ला विश्राम गृह ब्रम्हपुरी येथे मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना अन्यायग्रस्त गुंठेवारी प्लॉटधारक संघर्ष समिती,ब्रम्हपुरी तर्फे ब्रम्हपुरी गुंठेवारी प्लॉट संबंधात निवेदन देण्यात आले , या निवेदनात सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास होत असून  गुंठेवारी संदर्भात न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली. #गुंठेवारी #sudhirmungantiwar   #bramhapuri gunthewari

ब्रम्हपुरी नगरपरिषद अंतर्गत विविध भूखंड मालकांकडून सुमारे पाचशे ते सातशे  धंदेवाईक व नोकरदार , व  गरजू प्लॉट धारकांनी स्वतःचे पर बांधाकाम करण्याकरिता सन 2012-13 मध्ये खरेदी केले होते, माननीय दुय्यम निबंधक कार्यालय ब्रह्मपुरी येथे शासनाचा संपूर्ण मुद्रांक शुल्क भरून प्लॉट ची विक्री केलेली होति. सदर प्लॉट ही गुंठेवारी नियमांतर्गत करण्यात आलेले होते. विक्रीनंतर प्लॉट फेरफार करण्याकरिता माननीय तलाठी ब्रह्मपुरी यांच्याकडे अर्ज केले असता काही प्लॉट धारकांचे फेरफार होऊन सातबारा मिळालेले आहेत तर काही प्लॉट धारकांचे अजूनही फेरफार झालेले नाही. त्यामुळे सातबारा मिळू शकला नाही. घर बांधण्याकरिता नगरपरिषद ब्रह्मपुरीला परवानगी मागितली असता सदर ग्राहकांना घर  बांधण्याची परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे गरजू प्लॉट धारक स्वतःचे घर सुद्धा बांधकाम करू शकत नाही यासंदर्भात अनेकदा शासन व प्रशासनाशी पत्रव्यवहार करून न्याय मिळण्यासंदर्भात विनंती अर्ज केलेले आहेत. परंतु अजून पर्यंत कोणीही याची दखल घेतलेली नाही. यामध्ये ग्राहकांची कोणतीही चूक नाही. न्याय मागता मागता अनेक प्लॉट धारकांना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालेले असून निवेदनाद्वारे मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सदर प्लॉट धारकांना न्याय मिळवून द्यावा.हि मागणी करण्यात आली आहे .