जागतिक अपंगदिन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना अपंग निधीचे वितरण

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

जिवती,दि.७/१२/२०२२

येथील नगर पंचायत क्षेत्रातील दिव्यांग बांधवाकरिता दरवर्षी नगर पंचायतच्या उत्पादनाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येत असतो. व सदर निधी दरवर्षी अर्धवार्षिक स्वरूपात खर्च करण्यात येत असतो. सन २०२२- २३ या आर्थिक वर्षात नगर पंचायत मार्फत दिव्यांग बांधवाकरिता ५ टक्के निधी रुपये ८२ हजार राखून ठेवण्यात आलेली असून या निधीअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय खर्च व उदरनिर्वाह करिता २०२२ या कालावधीचा अर्धवार्षीक हफत्याचे निधी वितरण करण्यात आले, सदरचे निधी ३८ लाभार्थ्यांना त्याचे बँक खात्यात आरटीजीस द्वारे वितरित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा कविता आडे, उपाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, गटनेता तथा नगरसेवक अमर राठोड, कार्यालय अधीक्षक वरद थोरात, अश्विनी गुरमे, श्यामराव गेडाम, तयानबी शेख, सतलुबाई जुमनाके, कृष्णा सिडाम, किशोर पाटील, सागर कुऱ्हाडे, संजय जाधव, संभाजी गायकवाड, उदल आडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यानंतर सुद्धा अर्ज दिव्यांग बांधवांचे स्वीकृत करण्यात येतील तरी पात्र दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा कविता आडे यांनी केले आहे. या कार्यक्रमाकरिता नगर पंचायत क्षेत्रातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.