चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि.७/१२/२०२२
चामोर्शी तालुका खरेदी-विक्री संघाची नुकतीच जाहीर झालेली बिनविरोधी निवडणूक प्रक्रिया हि, नियमबाह्य ,बेकायदेशीर व लोकशाहीला घातक असल्यामुळे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याबरोबरच व रिट याचीका दाखल केली असता या याचिकेवर सुनावणी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ३०/११/२०२२ला सायंकाळी ६.३७ वाजता न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली असताना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड केल्याने कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा आपण येत्या काळात अवमान याचिका दाखल करणार.अशी मागणी पत्रकार परिषदेतून नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, माजी संचालक अशोक धोडरे, विश्वनाथ बुरांडे व सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी आदींनी केलेली आहे.
पुढे ते म्हणाले की,या पुढील सर्व निवडणूक प्रक्रिया थांबवून निवडणूक केसचा निकाल लागेपर्यंत हि प्रक्रिया कोर्टाच्या अधीन असेल तसेच व्यवस्थापक व संचालक मंडळाचे अधिकार गोठवण्यात आले. असा निकाल दिनांक १/१२/२०२२ च्या पुण्यनगरी व लोकशाही या मराठी दैनिकात आदेश प्रसिद्धी करून कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्याला आदेश दिले होते. तरी पण त्या आदेशाची अवेलना करून अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक घेण्यात आली .ही निवडणूक कोर्टाचे अवमान करणारी व नियमबाह्य आहे .त्यामुळे संबंधित कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या व्यक्ती व अधिकार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.एकंदरीत जनतेवर एवढा मोठा अन्याय होत असतांना काही लोकप्रतिनिधी पुढाकार न घेता गप्प राहून या अन्यायाला खतपाणी घालून जाहीर समर्थन करीत आहेत. अशा लोकप्रतिनिधींचा मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचबरोबर तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून जाहीर निषेध करीत आहे.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, माजी संचालक अशोकजी धोडरे, सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी, विश्वनाथजी बुरांडे,भैय्याची चलाख,स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष धनराज वासेकर, सहसचिव राजुभाऊ धोडरे, सुखदेव कुनघाडकर, निखिल धोडरे, सुरेश नैताम, प्रशांत पाल,साधु मिस्त्री,मुकुल सरकार, नेपाल ढाली, आदी उपस्थित होते.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी लोमेश रंधये यांना विचारणा केली असता
आमच्या कार्यालयाला कोणतेच आदेश न्यायालयाकडून प्राप्त झाले नसल्यामुळे, आपण ही अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे.यापुढे न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अधीन व त्याच्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करुन पुढील कार्य करीत राहणार असल्याचे मत प्रतिनिधीला सांगितले.