चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.७/१२/२०२२
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आमगाव महाल येथे आदरांजली वाहण्यात आली .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार, प्रमुख अतिथी प्रकाश निमकर, सुनील वांढरे , पुरुषोत्तम गुरुनुले, सुरेश केळझरकर, सुवेंदू मंडल, अभिषेक ढोंगे अनिल निमजे, गजानन बारसागडे, चंदू सातपुते, रुचिता बंडावार ,निशा रामगुंडे ,लीलाधर दूधबळे रतन सिकदार आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य गांगरेड्डीवार यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी व त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती अवगत करून दिली. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम गुरुनुले प्रास्ताविक सुरेश केळझरकर , आभार अभिषेक ढोंगे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी रेड ग्रुप च्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


