श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
वडसा, दि. ७/१२/२०२२
“बाबासाहेब मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, दीन दादलित आणि स्त्रियांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आण उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य होते. त्यांनी स्वत: च्या अलौकिक विद्धत्तेचा वापर समाजहितासाठी वापर केला.” असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहून अभिवादन केले. ते स्थानिक आदर्श महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रम सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला होता. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जयदेव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे डॉ. हितेंद्र धोटे यांनी केले. उपस्थितांचे आभार रासेयो विभाग प्रमुख प्रा. निलेश हलामी यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.