चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि. ७/१२/२०२२
स्थानिक यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वकृत्व स्पर्धा व भीम गितगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रेमानंद वालदे , प्रदिप भांडेकर , कुसुम सावसाकडे , प्रकाश बारसागडे साजेदा कुरेशी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्राचार्य शाम रामटेके यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा व त्यांच्या त्यागाचा आढावा घेतला . बाबासाहेबांचा वसा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज व्यक्त केली .याशिवाय मिळालेल्या शिक्षणरुपी संधीचे सोने करुन आपले जीवन सोनेरी करावे , असे आवाहनही विद्यार्थांना केले . याप्रसंगी वकृत्व स्पर्धा व भीम गितगायन स्पर्धतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे संचालन जयश्री कोठारे तर आभार प्रविण नैताम यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधाकर भोयर, रूपलता शेंडे, लक्ष्मण गव्हारे, यांनी सहकार्य केले.