चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि.७/१२/२०२२
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) पुणे अंतर्गत पंचायत समिती गट साधन केंद्र चामोर्शी व्दारा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
प्र. प्राचार्य- इतेंद्र चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग ५ ते ७ करीता कु. गंगा भोंगाडे मॅडम, अमर कुत्तरमारे सर तर वर्ग ७ ते १० करीता मृनाल तुमपल्लीवार मॅडम , प्रमोद भांडारकर सर या शिक्षकांनी स्पर्धेचे आयोजन केले.
या स्पर्धेत एकूण विदयार्थी गट ” अ “मधून १३ वर्ग (५ते ७ ) व वर्ग (८ते १० ) गट ” ब “मधून एकूण २४ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ब-याच विदयार्थ्यांनी सहभाग घेतला व कर्मचारीवृंदानी सहकार्य केले.