राजुऱ्याच्या जुगार व्हिडिओ व्हायरलची चौकशी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

राजुरा,दि. १०/१२/२०२२

राजुरा पोलीस स्टेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे करण्यात आली आहे. या व्हिडिओ मुळे पोलीस खात्यात चांगलीच खळबळ माजली आहे.दरम्यान या जुगार व्हिडिओची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच चौकशीच्या अनुषंगाने जुगार खेळत असलेल्या कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे जुगार खेळणे कर्मचाऱ्यांच्या अंगलट येणार काय याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडिओ मध्ये चार कर्मचारी दिसत आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस खात्यात चांगलीच खळबळ माजली आहे. आता या व्हिडिओची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून सत्यता जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

याच चौकशीच्या अनुषंगाने जुगार खेळत असलेल्या कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जुगार खेळणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. त्या कर्मचाऱ्यांवर प्रकरण शेकणार काय याकडे लक्ष लागले आहे.

त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा…..पोलीस स्टेशनमध्ये पोलीसच जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.हा गंभीर प्रकार असून याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात रोहित नामक मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून मारहाण करण्यात आली आहे व त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आहे.चौकशी मध्ये दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. …सुरज ठाकरे…जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमान पार्टी, चंद्रपूर जिल्हा.