श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.१२/१२/२०२२
देशात सद्या अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असुन वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी यातुन नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दररोज कुठली ना कुठली बेताल वक्तव्ये करून वेळ मारून नेण्यात येत आहे.शासन चालवण्याची कुवत नसल्याने धर्माच्या नावाखाली युवकांची माथी भडकवली जात आहेत.ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब असुन देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यासाठी गाव पातळीपासुन ते केन्द्रा पर्यंत सत्ता हस्तगत करणे अत्यावश्यक आहे. एकात्मतेच्या बळावर ते शक्य असल्याने सर्व काँग्रेसींनी आपसी मतभेद,मनभेद बाजुला सारुन एकोप्याने निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते देसाईगंज येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या ६० व्या व शिवाणी वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत कार्यक्रमात सत्कार सभारंभाला उत्तर देताना बोलत होते.यावेळी आदिवासी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आ.डाॅ.नामदेव उसेंडी,डाॅ.नितिन कोडवते, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, माजी सभापती परसराम टिकले,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी,युवक काँग्रेस सहसचिव कुणाल पेंदोरकर, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके,आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे,देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल,राजु रासेकर,माजी नगरसेवक हरिष मोटवाणी, दिलीप घोडाम,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास ढोरे, उपसरपंच संजय करंकर, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या गावागावात मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या जुने जाणते कार्यकर्ते आहेत.केन्द्रात काँग्रेसची सत्ता नसली तरी सच्च्या कार्यकर्त्यांची नाळ पक्षाशी जुळली असल्यानेच काँग्रेस जीवंत आहे.माञ अलिकडे त्या लोकांपर्यंत पोहचल्या जात नसल्याने कार्यकर्ते विखुरल्या गेले आहेत.त्यांना एकञ आणण्याची जबाबदारी युवकांची असुन युवकांनीही आता सक्रिय राजकारणात उतरणे तेवढेच गरजेचे असल्याचे सांगितले.
दरम्यान कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजीत रक्तदान शिबिरात २४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.तसेच जवळपास ४०० लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु नरोटे,प्रास्ताविक नितिन राऊत यांनी तर आभार पंकज चहांदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पिंकु बावणे,विलास बन्सोड,कमलेश बारस्कर, बबन गायकवाड,अरुण कुंभलवार,यामिना कोसरे, रजनी आञाम,पुष्पा कोहपरे,पद्मा कोडाप,रमेश पर्वतकार आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.