श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड, दि.१२/१२/२०२२
नवेगाव हुंडेश्र्वरी येथे दारु व्यसनमुक्ती वर सत्संग कार्यक्रम
परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना नवेगाव हुंडेश्वरी यांचे माध्यमातून व्यसनमुक्ती वर पालखी मार्गदर्शन व सत्संग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर, कार्यक्रमाचे सहउद्घाटक लक्ष्मीकांत धानोरकर .जिल्हा उपाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित काळे जिल्हा कोषाध्यक्ष कार्यक्रमाचे उपाध्यक्ष दिगंबर वासेकर जिल्हा संघटक हे होते.तसेच प्रमुख अतिथी संजय गजपुरे जि प सदस्य ,अविनाश राऊत सुरेश भाऊ जीभकाटे. भालचंद्र रोहनकर, भाऊराव ठाकरे प्रकाश अल्गमकर,मारुती वाकूलकर,शारदा चौधरी कल्लू ताई नेवरे सरपंच हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात गावात परमपूज्य शेषराव महाराज यांची पालखी व दारू व्यसनमुक्ती वर जनजागृती दिंडी, भजनाच्या माध्यमातून झाली. आपल्या उद्घाटनिय भाषणात अनिल डोंगरे यांनी दारूची नशा ही जीवनाची दुर्दशा असून जो व्यक्ती दारूच्या आहारी गेला त्याचे जीवन अंधारमय असून ज्या गावात दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांची संख्या जास्त असते त्या गावाच्या मुख्य चौकात महिलांना व या व्यसनाच्या आहारी नसलेल्या लोकांना त्या चौकातून जाणे किंवा उभे राहणे कठीण असते. नवेगाव हुंडेश्र्वरि हा गाव या संघटनेच्या माध्यमातून दारू व्यसनमुक्ती कडे वाटचाल करून राहिला आहे पंधरा ते वीस वर्षापासून या गावचे 70 ते 80 टक्के लोक दारू व्यसन मुक्त झाले आहे. हा गाव दारू व्यसनमुक्तीच्या माध्यमातून आदर्श गाव म्हणून वाटचाल करीत आहे. तसेच या गावच्या आजूबाजूच्या गावचे लोकही दारू व्यसनमुक्त होऊन राहिले आहे.या संघटनेचे पदाधिकारी समाजात दारू व्यसन मुक्तीचे समाजसेवेचे कार्य करीत असल्याने त्यांना सुंदर जीवन जगण्याचा खरा आनंद मिळत आहे असे ते यावेळी बोलले. या कार्यक्रमात आजूबाजूच्या गावच्या वीस लोकांनी दारू व्यसनमुक्तीच्या संकल्प घेतला तसेच या गावातील दारू व्यसनमुक्तीच्या कार्यकरिता पूर्ण शक्तीने महिलाचा पुढाकार असल्यामुळे या गावच्या महिलांचा जिल्हा संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परमपूज्य शेषराव महाराज नवेगाव हूडेश्वरी संघटनेचे पदाधिकारी बबन गुरणुले श्री. तुकाराम रेघ्ते श्री.मौसम गुरणुले श्री. गुरुदास गुरनुले श्री दादाजी गुरूनुले श्री शरद पांडव मंगल शेंडे श्री कैलास नेवारे श्री मोरेश्वर नेवारे श्री अशोक मोहुरले व इतर पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.