श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भद्रावती,दि.१२/१२/२०२२
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कचराळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच भाग्यश्री येरगुडे, उपसरपंच छत्रपती एकरे उपस्थित होते. शिबिराकरिता घोडपेठ आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी मनोज मेश्राम, दिपाली खिरटकर, मंगेश येऊल, आरोग्य सेविका खोब्रागडे, आरोग्य सेविका के चक्रनारायण, आशा सुपरवायझर संगीता मोरे उपस्थित होते. शिबिरामध्ये लहान मुले, वृद्ध, गरोदर माता, कुमारिका व इतर स्त्रियांची तपासणी करण्यात आली. शिबिरा करता आशा वर्कर सुचिता काळे, अर्चना गेडाम, अरुणा सोनटक्के, सीमा सुखदेवे, सखुबाई खोब्रागडे, मनीषा सारंगधर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कचराळाच्या शिक्षिका उज्वला खिरटकर, अर्चना दिगंबर, मदतनीस इंदुबाई कामटकर, श्वेता सोमलकर यांनी सहकार्य केले. यावेळी १५० रुग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.