श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ब्रह्मपुरी, दि.१२/१२/२०२२
ब्रह्मपुरी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उदापूर गावा जवळील राईस मिल जवळ मूडजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातून रुग्ण घेऊन मुडझा परत येथे जात असताना पारडगाव जवळील पेट्रोल पंपा समोर राष्ट्रीय महामार्गावर राईस मिलच्या जवळपास मध्य धुंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकाच्या चालकाने उभ्या ट्रकला धडक दिल्याने आज दिनांक 12 डिसेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात घडला. यात तीन रुग्ण गंभीरित्या जखमी असून त्यांना ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
तर राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही गावात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात बेधुंद अवस्थेत असलेल्या मोटार सायकल स्वाराने आरमोरी वरून ब्रह्मपुरी मार्गे निघणाऱ्या कॅनल वर काम करणाऱ्या कॅम्पर च्या मागच्या बाजूला धडक दिल्याने तो किरकोळ जखमी झाला असून त्याला ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सदर मोटर सायकल स्वार व्यक्ती हा आरसोडा येथील असल्याची विश्वासनीय माहिती सूत्रांकडून समोर आली आहे
कोणतीही मोठी जीवित हानी झाली नसल्याचे कळते अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.