शेतातील मोटर पंप चोरी प्रकरणी चकपिरंजी येथील दोन युवक सावली पोलीसांच्या ताब्यात .

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

सावली ,दि. २५/१२/२०२२

केशरवाही येथील शेतकरी अभिषेक बोरकुटे हे  ठेक्याने करीत असलेल्या चकपिरंजी येथील शेतातील विहीरीवर पिकांना पाणी देण्यासाठी लावून असलेली ३ एच.पी ची कींमत अंदाजे  २०,००० रूपये ची सबमर्सीबल मोटर पंप अज्ञात चोराने चोरून नेली तशी तक्रार पो स्टे सावली दिली होती.  दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच वेगाने तपास चक फीरवून गोपनीय माहीती च्या आधारे तपास सुरू केले असता सदरचा गुन्हा दोन आरोपींनी मिळून केल्याचे प्राथमिकरित्या समजुन आले. संशयीत इसम नामे १) अनिल नेहरू मोहुर्ले वय ३७ वर्ष २) रोहीदास भिमराव लोणारे वय ३६ वर्ष दोन्ही रा. चकपिरंजी, ता. सावली जिल्हा चंद्रपूर यांना चंद्रपूर शहर येथून ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयात नमूद दोन्ही आरोपींतांना अटक करून त्यांचे ताब्यातून त्यांनी चोरी केलेली ३ एच.पी ची सबमर्सीबल मोटर पंप हस्तगत करण्यात आली आहे. सावली पोलीसांनी सदरचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासातच भटांना उघडकीस आणून गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

सदर गुन्हयाचा तपास रविंद्रसिंह परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे साहेब यांचे मार्गदर्शनात व ठाणेदार आशिष बोरकर पोलीस स्टेशन सावली यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मडावी, पो.शि. चंद्रशेखर गंपलवार, धिरज पिदूरकर करीत आहेत.