श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
राजुरा,दि.२५/१२/२०२२
राजुरा पोलीस स्टेशन हे नेहमीच काही ना काही कारणाने वादामध्ये राहत आलेले आहे .आता यात आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे. पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यांचा जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ रोहित बत्ताशंकर यांनी काढला होता .ही माहिती मिळताच पोलीस शिपायाने प्रभारी ठाणेदार संतोष दरेकर यांच्या सांगण्यावरून त्याला बोलावले व मारहाण केली.त्यानंतर त्याचा मोबाईल हिसकावून दमदाटी केल्याची याची तक्रार युवा स्वाभिमान पक्षाचे जिलाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या मध्यस्थीने पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांच्याकडे केली. विशेष म्हणजे, या जुगाराच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित होताच एका वकिलामार्फत मोबाईल परत दिला.
एरव्ही पत्ते खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस धाड टाकून कारवाई करीत असल्याचे अनेक उदाहरण आहे. परंतु पोलीस स्टेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी खुलेआम जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. झालेला प्रकार हा गुन्हा आहे तरी सुध्दा अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणात प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर व संदीप बुरडकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत या प्रकरणाला न्याय मिळणार नाही. अशी भूमिका घेत युवा स्वाभिमान पक्षाचे जिलाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अधिवेशनादरम्यान या बाबत तक्रार केली आहे.येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये यावर काही तोडगा न निघाल्यास या विरोधामध्ये न्यायालयांमध्ये याचिका दाखल करणार असून ,पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचेहि सुरज ठाकरे आणि रोहित यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले आहे. अधिवेशनादरम्यान करण्यात आलेले तक्रारी संदर्भात शासन सतर्क असल्याने आता यावर गृहमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gambeling At Rajura police staion by police men
#surajthakare #devendrafadanvis #newsjagar #rohitbatashankar