पालेबारसा येथील इसमाची आत्महत्या 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

पाथरी,दि. २६/१२/२०२२

सावली तालुक्यातील पालेबारसा येथील इसमानी आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
रवींद्र शिवाजी दळांजे, वय ५५ रा. पालेबारसा असे इसमाचे नाव असून तीन दिवसापासून ते बेपत्ता असल्याने गावकऱ्यांनी त्याची शोधाशोध केली असता सोमवार रोजी पालेबारसा ते उसरपार चक येथील जंगलात फाशी लागलेल्या अवस्थेत आढळून आले याची माहिती पाथरी पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला परंतु या व्यक्तीने आत्महत्या का केली असावी याचा तपास पाथरी पोलिस करीत आहे .

suicide by hanging at palebarsa, saoli taluka