गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
धानोरा,दि.२६/१२/२०२२
धानोरा तालुका मुख्यालायापासून 35 किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र सावरगाव च्या हद्दीतील नागरिकांना आरोग्य विभागातील योजनेविषयी जनजागृती व आरोग्य तपासणी करून देण्याच्या उद्देशाने दि.24 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्याचे उदघाटन सावरगाव ग्रामपंचायती तील नवनिर्वाचित सरपंच मोनिका पुडो यांनी केले तर शिबिराच्या अध्यक्ष स्थानी एस आर पी एफ चे पोलीस निरीक्षक हवका तर प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ चे पोलीस निरीक्षक राऊत व डॉ.सीमा गेडाम होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र सावरगाव पोउपनी रमेश पाटील यांनी प्रत्येकाने आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन व महत्त्व पटवून देवून पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती सांगून त्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. तसेच डॉ. सौ. सीमा गेडाम मॅडम यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले
त्याचप्रमाणे समुपदेशक सौ. बबिता मेश्राम धानोरा यांनी मुली वयात येत असताना येणारे अनेक शारीरिक समस्या निर्माण होत असतात अशा वेळी समस्यांना न घाबरता व स्वतः चे मन विचलित न होऊ देता चांगले मानसिक आरोग्य सुदृढ करून आरोग्य बाबतीत काळजी घेणेबाबत शासकीय आश्रम शाळा सावरगाव येथील ५० किशोरवयीन विद्यार्थीनी यांना मार्गदर्शन केले
सदर आरोग्य शिबिरात 90 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली व 40 नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तर 120 नागरिकांची बीपी सुगर तपासणी 165 नागरिकांची रक्त तपासणी व 50 नागरिकांची सिकलसेल तपासणी व 65 नागरिकांच्या इतर तपासण्या करून सर्व नागरिकांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरास धानोरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ. सीमा गेडाम मॅडम, डॉ. राजेश बतुलवार सर, लॅब टेक्निशियन वैभव बारसिंगे, रवी वैरागडे, समुपदेशक सौ. बबिता मेश्राम, परिचारिका सौ. अस्विनी बांबोळे परिचारिका सौ. जे. जे. घोडाम, एमपीडब्ल्यू अ. स. नरोटे उपस्थित होते.
त्याच्रमाणे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनेतून इतर लाभ मिळवून दिला त्यामधे 26 राशन कार्ड दुय्यम प्रत 3 जात प्रमाणपत्र 6 अधिवास प्रमाणपत्र 83 पॅनकार्ड 32 आभाकार्ड 1 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना व 75 डिजिटल सातबारा वाटप करण्यात आले.
सदर आरोग्य मेळाव्याला परिसरातून ३०० ते ३५० नागरिक व विध्यार्थी उपस्थित होते उपस्थित नागरिकांना जेवण व्यवस्था करण्यात आली होती. सदर आरोग्य मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे मनोज जासूद पोलीस हवालदार भास्कर किरंगे, सुधाकर उसेंडी, मुलेटी,कुनगडकर ,राऊत ,सलामे,देशमुख,इस्कापे, गवळकर, कपगते परिहार, कावळे, रामटेके, व जिल्हा पोलिस आमलदार व रा.रा.पो.बल यांनी विशेष परिश्रम घेतले.