श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
तुळशी येथे विसोरा व आमगाव केंद्राची शिक्षण परिषद
देसाईगंज दि.०२/०१/२०२३
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाठी सातत्याने शासनस्तरावरुन नव-नविन संकल्पना राबविल्या जात आहेत.या संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण परिषद चे आयोजन केले जाते. त्यामुळे शिक्षण परिषदेच्या माध्यमातून नवे-नवे तंत्र व संकल्पना समजून घेऊन त्या शिस्तीने अंमलात आणल्या पाहिजेत .कारण शिस्तप्रिय विद्यार्थी व शिक्षक शाळेचा नावलौकिक वाढवतात ,असे मत केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी व्यक्त केले. ते तुळशी येथे आयोजित सहाव्या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
केंद्र आमगाव आणि विसोरा गटसाधन केंद्र यांची संयुक्त शिक्षण परिषद दि.३० रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुळशी येथे संपन्न झाली.कार्यक्रमाला उद् घाटक म्हणून तुळशी ग्रामपंचायत चे सरपंच चक्रधर नाकाडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरारी दुनेदार , मुख्याध्यापक गजानन शेंद्रे,प्रभू गोमासे , रवि वालदे , विष्णू दुनेदार , दिलीप मेंढे ,जयशिव सुंदरकर, रामेश्वर गभणे , चुन्नीलाल जांभुळकर , धनपाल मिसार ,समूह साधन केंद्रातील साधन व्यक्ति जितेंद्र पटले, कु.राणू ठाकुर , अरविंद घुटके, विषयतज्ज्ञ वैशाली खोब्रागडे , फुलोरा समन्वयक जैमिनी लाडे, प्रमोद खांडेकर उपस्थित होते.
परिषदे दरम्यान निपुण भारत, फुलोरा उपक्रम, करिअर मार्गदर्शन, निपूण भारत भाषिक कौशल्ये, संख्या साक्षरता, प्रशासकीय कामे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. न्यास २०२४,नविन शिक्षण धोरण व निपुण भारत अंतर्गत १००% केंद्रांतर्गत शाळा प्रारंभिक मुक्त उद्दिष्ट साध्य करणे, सन २०२६-२७ पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत भाषिक साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त होणे, कृतीपुस्तिका, आनंददायी अध्यापन पध्दतीचा प्रत्यक्ष उपयोग करणे, फुलोरा उपक्रम वर्ग व विषय निहाय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम यांचा आढावा, जिल्हा, राज्य व केंद्रस्तर विश्लेषण व २०२४ ला अध्ययन निष्पत्तीनुसार करावयाची कार्यवाही , निपुण भारत अध्ययन सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणींवर सुलभन, प्राप्त शासन निर्णयाचे वाचन व करावयाची प्रत्यक्ष कार्यवाही आदी तासिका घेण्यात आल्या.
परिषदे दरम्यान गटशिक्षणाधिकारी सदानंद सलाम यांनी भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले.तसेच गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल धनपाल मिसार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप सहारे यांनी केले तर कल्पना पिलारे यांनी उपस्थिती मंडळीचे आभार मानले. यावेळी आमगाव व विसोरा केंद्रातील जि.प.शाळेतील व खाजगी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.