मोबाईल वापरामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढले :- मनोज गभने पोलीस निरीक्षक.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे बक्षीस समारंभ.

चिमूर,दि.०२/०१/२०२३

ग्राम दर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधी मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त क्रिडा, सांस्कृतिक, माजी विद्यार्थी मेळावा व पालक मेळावा आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण समारोह दिनांक 30 डिसेंबर 2022 शुक्रवारला घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक रणदिवे अध्यक्ष ग्राम दर्शन शिक्षण मंडळ चंद्रपूर,
बक्षीस वितरक मनोज गभने पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिमूर, प्रमुख अतिथी एस. बी. लोणारे, सदाशिव मेश्राम प्राचार्य ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वर्भे माजी प्राचार्य भिवाजी वर्भे कनिष्ठ महाविद्यालय बोथली, विनोद रणदिवे संचालक ग्रामदर्शन शिक्षण मंडळ चंद्रपूर, सातपुते कनिष्ठ महाविद्यालय प्रमूख इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी ठाणेदार मनोज गभने यांनी विदयार्थ्यांना आपल्या मनोगतातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विदयार्थ्यांना मोबाइलचा होत असलेला दुरुपयोग त्यातून निर्माण होणारे गुन्हे यातून विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा बोध याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तर वर्भे यांनी शाळेची प्रगती होत आहे. या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो ते पुढे सुजाण नागरिक घडतात असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी सांगितले की, शाळेची प्रगती होत आहे त्यामध्ये सर्वांचे मोलाचे योगदान आहे पुढेही सर्वांच्या सहकार्याने शाळेची अशीच प्रगती होत राहील अशी यावेळी ग्वाही दिली.

मान्यवरांच्या हस्ते सत्र 2022-23 मधील आदर्श विद्यार्थी
म्हणून रोनक मिलिंद गंपावार याला शिल्ड, प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. तसेच उत्कृष्ठ स्वयंसेवक, अपूर्व विज्ञान मेळावा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुनानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय गिरडे यांनी तर आभार प्रदर्शन घाटूर्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.