विज्ञान प्रदर्शनातील आकर्षक प्रतिकृतींनी वेधले परीक्षकांचे लक्ष

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर

कोरची,दि.०५/०१/२०२३

17 मॉडेल सादर-रियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्पर्धा

येथील रियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवीन वर्षाचे औचित्य साधून दिनांक 2जानेवारी सोमवारला विज्ञान प्रदर्शनी स्पर्धा पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या 17 प्रतिकृती सादर केल्या.
विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन रियल इंग्लिश मीडियम स्कुल चे संस्थापक मनोज टेंभुर्णे यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून सुरज हेमके, नंदू गोबाडे, शाळेचे मुख्याध्यापिका वंदना सहारे, मंगला दिहारे ,प्राजक्ता मारवाडे ,दीपक अंबादे, सुरेखा काटेंगे, ईमोती मलगाम ,सोनू पेंदोर आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्यात असलेली कल्पकता प्रत्यक्षात कृतीमध्ये यावी. या हेतूने वर्ग चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडलेली प्रतिकृतींची पाहणी परीक्षकांनी करीत उत्कृष्ट प्रतिकृती सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण सुरज हेमके, नंदू गोबाडे यांनी केले. विशेष म्हणजे परीक्षकांनी प्रतिकृती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन विकेश उंदीरवाडे तर आभार केवी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रियल इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.