श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर
व्याहाड ,दि.०५/०१/२०२३
भिमा कोरेगाव शौर्य दिन सलामी महोत्सव संपन्न
बौद्ध धम्म एक जीवनी आहे. मी २०१४ ला श्रीलंकेत बौद्ध धम्माचा स्विकार करून धर्मांतर केले. एवढेच नाही तर बौद्ध राष्ट्र थायलंड येथे जाऊन १०० दिवसाची परिचारिका स्वीकारून दीक्षा नंतर भिक्षाट नाचे कार्य केले. हे सर्व करतांना मी धनवान आहे, हा विचार बाजूला ठेवला. कारण “सिद्धार्थ गौतम” या चित्रपटातून मला बौद्ध समजला. मी त्यात बुद्धाची भूमिका केली. बुद्ध समजून घेतला आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध राष्ट्राशी संबंध प्रस्तावित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न “भारत बौद्धमय करीन” या करीता धम्म प्रचाराला सुरुवात केली. सम्राट अशोकांनी ८४,००० हजार स्तूप निर्माण केली तर मी ८४,००० हजार बौद्ध मूर्तीची वाटप करून प्रथम ८४,००० हजार माणसं जोडण्याचे कार्य करतोय असे विचार गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते गगन मलिक यांनी गडचिरोली चंद्रपुर मार्गावरील वैनगंगा नदी तीरावर ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशन च्य वतीने आयोजित भिमा कोरेगाव शौर्य दिन सलामी महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे, होते, तर स्वागताध्यक्ष रिपाई चंद्रपुर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे यांचे आयोजनात गगन मलिक फाउंडेशन चे समन्वयक नितीन गजभिये, स्मिता वाकडे, अमित वाघमारे, विकास तायडे, एड. राम मेश्राम, मुनीश्वर बोरकर, लता लाकडे नगराध्यक्ष सावली, समया पसुला, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समोयचीत मार्गदर्शन केले. तर गगन मलिकजी यांनी मी बौद्ध धम्म का घेतला? या विषयी सविस्तर वृत्तात मांडून टीका टिपणी करणाऱ्यांनी माझ्या कार्याला समजून घेऊन धम्म प्रचार कार्यात सक्रीय सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी केले.
दोन दिवसीय चाललेल्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी भिमा कोरेगावातील लढाईत ज्या शूरवीरांनी शौर्यानी विजय प्रप्त केला त्या शौर्य वीरांच्या स्तंभाला सलामी देण्यात आली. दुसर्या दिवशी दीप प्रज्वलन करून २२२ अष्टधातू बुद्ध मुर्त्यांचे विहार, वैयक्तिक व घरगुती करीता वाटप करण्यात आले. याप्रसंगी समता सैनिक दल लोनखैरी यांचे पथसंचलन तर विजय शेंडे व संच तसेच सावित्रीबाई फुले महिला संच आणि जनजागृती मंच यांचे विशेष कार्यक्रम सादर करून कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम आयोजन करीता राहुल रायपुरे, किशोर उंदिरवाडे, लोमेश सोरते, मुक्तेश्वर नगराळे, विनायक दुधे, पंडित मेश्राम, प्रशांत ढोलने तसेच सावली तालुका व गडचिरोली तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन संघमित्र निमगडे व अमित वाकडे यांनी केले तर आभार दिलीप गोवर्धन यांनी मानले. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत बौद्ध बांधवांची उपस्थिती होती.