शहरातील आंबेडकर वार्डातील मुख्य मार्गावरून वाहतो सांडपाणी दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात,यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची नागरिकांची मागणी

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,दि.०५/०१/२०२३

अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रगत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज शहराच्या आंबेडकर वार्डातील चक्क मुख्य मार्गावरून सांडपाणी वाहत असुन रस्त्यालगतच्या डबक्यात साचून राहात असल्याने सुटलेल्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती लक्षात घेता मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना यथाशिघ्र समस्या मार्गी लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
देसाईगंज शहराच्या फव्वारा चौक-नैनपुर मार्गावरील बिरसामुंडा चौका लगतच पाणी साचून राहात असल्याने पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.देसाईगंज नगर परिषदे अंतग॔त शहराच्या नाल्या व परिसर साफसफाईसाठी मोठ्या प्रमाणात मजुर कामावर ठेवण्यात आले असुन महिण्याकाठी साफसफाईवर लाखो रुपये खर्च केले जात असल्याचे वास्तव आहे.असे असताना शहराच्या वार्डातील नाल्या तुंबल्याने व अनेक नाल्या तुटफुट अवस्थेत असताना देखभाल दुरुस्तीच करण्यात येत नसल्याने नगर प्रशासन करतो तरी काय?असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.
दरम्यान शहराच्या आंबेडकर व माता वार्डात ही समस्या अधिकच गंभीर होऊ लागल्याने सांडपाणी साचून सुटलेल्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता व साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती लक्षात घेता सांडपाण्याची यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी देसाईगंज शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पिंकु बावणे,अमोल पेंदाम,दिनेश पञे,लक्ष्मण बुरांडे आदी नागरीकांनी केली आहे.