धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांचा भारतीय जनता पार्टी देसाईगंजच्या वतीने जाहीर निषेध

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,दि.०५/०१/२०२३

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे व भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे “धर्मवीर” नव्हते, असं रेटून खोटं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ दिनांक 03 जानेवारी 2022 रोजी देसाईगंज येथील फव्वारा चौक, येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या प्रमुख उपस्थित तीव्र जाहीर निषेध नोंदविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अजित पवार म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज हे “धर्मवीर” नाहीत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देहाची हाल अपेष्टा सहन केली पण धर्म बदलला नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हे कोणत्या नेत्यांनी म्हटले नाही तर हिंदुस्थानातील तमाम विद्वानांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर असे म्हटले आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रा पार नेले. अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरुद्ध बोलून छत्रपती संभाजी महाराज हे “धर्मवीर” नव्हते असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा धिक्कार असो असे सांगत भारतीय जनता पार्टी देसाईगंज तालुका च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, भारतीय जनता पार्टीचे देसाईगंज तालुका अध्यक्ष राजूभाऊ जेठानी, वसंताभाऊ दोंनाडकर भाजपा तालुका महामंत्री, अर्चनाताई ढोरे मा उपसभापती, किसान मोर्चाचे झोडे पाटील, शक्तीकेंद्रप्रमुख गुणवंत पाटील नाकाडे, मा नगरसेवक दीपक झरकर, विलास ढोरे, चौपनदाश विधाते, माजी नगराध्यक्ष श्यामाभाऊ उईके, मेघश्यामजी डांगे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.