श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने वैज्ञानिक,सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती ज्यांच्यामुळे झाली ती विद्येची देवता म्हणजे माता सावित्रीबाई फुले होत. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर त्याच्या जयंतीचा कार्यक्रम ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय बोरकुटे उपसरपंच नवेगाव पांडव होते. उद्घाटक म्हणून प्रा. संजय मगरे , प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नागभिड सुनिता भंडारे,नगरपरिषद नागभिड चे जेई राजश्री झाडे, ने ही विद्यालय मुख्याध्यापक ठाकरे सर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका मनिषा वासनिक ,धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव चे अर्जुनकर मॅडम, डॉ.पल्लवी गलगट मेडम, डॉ. काटेखाटे मेडम, आणि पुर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी वृंद. तलाठी ज्ञानेश्वर मगर , पांडुरंग रामटेके, ग्रामसेवक शिरसागर, शारदाताई नवघडे , सर्व ग्रामपंचायत सदस्य,सदस्या, कर्मचारी,शालेय विद्यार्थ्यी , मोठ्या संख्येने गावांतील स्रीयां व पुरुष ,तरुण मुलं ,मुली मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोणा काळात ज्या ज्या शाळा, सरकारी दवाखाने,कर्मचारी, यांनी भरीव योगदान गावासाठी दिले त्या सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.. महाराष्ट्र स्तरावर अकरा गावच्या टापर सरपंचाची निवड झाली त्यामध्ये अँड. शर्मिला रतनकुमार रामटेके यांची निवड करण्यात आली.म्हणून सरपंचा अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांचा गावाच्या नवतरूण मंडळा घ्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. पानसे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर प्राप्त झाल्याने त्यांचासुद्धा ग्रामपंचायत नवेगांव पांडव यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.सारजाबाई बांधते हया आजीचा लुगडा चोळी देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत’ मी सावित्री बोलते’ हे एकपात्री प्रयोग सादर केले व सावित्रिबाई फुले यांच्यावर गीते गायले.प्रास्ताविक अँड शर्मिला रतनकुमार रामटेके.
कार्यक्रमांचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन ने ही विद्यालयाचे शिक्षक श्री. सतिश डांगे सर यांनी केले.