कोरचीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस निमित्ताने गावात स्वच्छता अभियान भव्य रॅली

श्री.नंदकिशोर वैरागडे,गडचिरोली जिल्हा विशेष प्रतिनिधी,न्यूज जागर 

कोरची,दि. ०५/०१/२०२३

महिला पो.उ.नि. आशावरी शेडगे सह तीन आदर्श शिक्षक तर एका समाजिक कार्यकर्ता यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार

कोरची शहरातील महात्मा फुले चौकात ३ जानेवारी २०२३ रोजी महात्मा फुले माळी समाज कोरचीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती व बालिका दिवस संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून साजरा केला.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची नगराध्यक्षा सौ. हर्षलता भैसारे तर उद्घाटक माळी समाजाचे कार्यकर्ते देवाजी मोहुर्ले, मार्गदर्शक म्हणून पांढरीगोटा मुख्याध्यापक चंद्रशेखर अंबादे, कोटरा शिक्षक रमेश नाणे, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनोज अग्रवाल,नगरसेविका तेजस्विनी टेंभुर्णे, नगरसेवक धनराज मडावी, दिलीप मडावी विठ्ठल गुरनुले, मुख्याध्यापक शालिकराम कराडे, प्रा.मुन्ना रुखमोडे, राकाँ शहर अध्यक्ष चेतन कराडे, डॉ. स्वप्नील राऊत, काँग्रेस सो.मेडिया अध्यक्ष वसीम शेख, माजी सैनिक चतुर सिंदराम, गौरव कावडे, व्यसनमुक्ती अध्यक्ष निळाताई कीलनाके, प्रा.बांगरे प्रा. संजय दोनाडकर, लोकमत पत्रकार राहुल अंबादे, आरटीआय पत्रकार आशिष अग्रवाल, पत्रकार जितेंद्र सहारे, पत्रकार नंदकिशोर वैरागडे, पोलीस शिपाई मडावी मॅडम उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस निमित्ताने कोरची तालुक्यात प्रथमच महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेल्या आशावरी शेडगे, आदर्श शिक्षिका पुरस्कृत जांभळी जि. प.शिक्षिका कु. त्रिवेणी गायकवाड, कोरची श्रीराम विघालाय उत्कृष्ट मनमिळावू शिक्षक नंदूजी गोबाडे, चामोर्शी जि. प. शाळा शिक्षक ओमदेव आंदे, तर शहरातील माळी समाजाचे कार्यकर्ते विजय कावळे यांचे माळी समाजाच्या महिला मंडळींकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई यांची उत्कृष्ट रांगोळी व लहान बालकांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण व सुंदर नृत्य सादर करणाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व पेन बुक बक्षीस देवून गौरविले. महात्मा फुले चौक ते लुंबिनी बुद्ध विहार अशी शहरातून वंदनीय सावित्रीबाई फुलेकी जय, जय ज्योती-जय क्रांती चा जयजयकार करून रॅली काढण्यात आली. सायंकाळी सर्वांनी अल्पोपहार ग्रहण केला तसेच रात्रौला महामानवावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमच्या माध्यमातून येथील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित चारोळी गीत गायल्या व लहान बालकांनी नृत्य सादर केला.

याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना समाजात स्त्री जीवनाचे महत्त्व काय हे पटवून दिले. तर सत्कारमूर्ती महिला पोलीस उपनिरीक्षक आशावरी शेडगे यांनी सुद्धा मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र सांगताना स्त्री जीवन, शिक्षण कायदे विषयी सांगितले. तर मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक चंद्रशेखर अंबादे, शिक्षक रमेश नाणे यांनी क्रांतीज्योती यांच्या जीवनावर विस्तृतपणे यावेळी मार्गदर्शन केला. या कार्यक्रमाचे संचालन कु. मानसी वाढई तर प्रास्ताविक राकेश मोहूर्ले तर उपस्थित मान्यवर व गावकऱ्यांचे आभार कल्याणी शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण माळी समाजातील महिला वर्ग, युवक, युवती यांनी अथक परिश्रम घेतले.