बेतकाठी येथे तंटामुक्तीच्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधि,गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर

कोरची,दि.०७/०१/२०२३

कोरची मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बेतकाठी ग्रामपंचायत मध्ये दिनांक ७ जानेवारी शनिवारला दुपारी दीड वाजता तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराने एका नव वर वधूचे आंतरजातीय विवाह सोहळा हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तिलक सोनवानी यांच्या अध्यक्षतेखाली लग्न लावून देण्यात आले आहे.
तंटामुक्ती समितीचे निमंत्रक तथा पोलीस पाटील गणेश गुरनुले, सरपंच सौ कुंतीताई हुपंडी, उपसरपंच हेमेंद्र कावडे, ग्रामसेवक देवानंद भोयर, ग्रा.पं.सदस्य सुरेश काटेंगे, महेश झेरिया, वीरेंद्र आंदे, रुपेश गंगबोईर, इमरानउद्दीन शेख, सौ जयश्री ढवडे, उपेंद्र आदे, रामजीलाल कुंजाम, किशन बघवा, सौ नम्रता नंदेश्वर, श्यामकार्तिक गुरनुले, प्रतिष्ठित नागरिक मुरारी कुंजाम, प्यारेलाल कुंजाम प्रकाश नैताम, भुवनेश्वर डेहलिया, रामदास टेंभुर्णे, रामलाल बुडाझेलिया, रतन सरपा, चैत्राम सरपा, कवालदास नाईक तसेच गावातील महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर चि.रामकुमार देवारसिंग कचलामे (२३) रा. डुंबरघुच्छा,ता. अंबागड चौकी, जि मोहला छत्तीसगड, वधू कु. सुकारो बुधऊराम बघवा (२१) रा. बेतकाठी, ता कोरची, जि गडचिरोली या दोघांचे मागील पाच ते सहा महिन्यापासून प्रेम संबंध सुरू होते त्यांनी आंतरजातीय विवाह करण्याचे ठरविले होते त्यामुळे त्यांनी बेतकाठी येथील तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे रितसर अर्ज करून लग्न लावून देण्याची मागणी केली. तिलक सोनवानी यांनी दोघांचे कागदपत्र तपासून तंटामुक्तीच्या माध्यमातून गावात सभा घेऊन नंतर या दोघांचा लग्न सोहळा पार पडला. सदर लग्न गावातील राम मंदिर येथील पुजारी दयाराम सर्पा यांच्या उपस्थितीत झाले. तसेच तंटामुक्ती समितीच्या व गावकरी यांच्या वतीने नव वर-वधूला जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आले. सदर कार्यासाठी तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केला.