कोटरा व कोहका येथील जिओला नेट सुरू कारा

  1. by Nandkishor Vairagade
    कोरचीतालुक्यातील कोटरा व कोहका तेथे जीओचे मनोरे उभे करून दो महिने लोटले या मनोऱ्यावरून फक्त बोलणं होत आहे तीथे नेट सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांनी केली आहे.कोटरा परिसरात पंधरा ते वीस गावातील लोकांचे व कोहका परिसरातील तीन ग्रामपंचायतील गावा मधील गावातील नागरिकांना जिओच्या टावर वरून फक्त बोलणं होत आहे पण डाटा नेटवर्कर सुरू केला गेला नाही त्यामुळे या परिसरातील लोकांना शासकीय कामे करण्यासाठी खूप अडचणीचे निर्माण झालेले आहे त्यामुळे अँड्रॉइड फोन असूनही त्याचा कसलाही प्रकारे उपयोग होत नाही त्यामुळे जिओ कंपनीने डाटा नेट तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांनी जिओचे विदर्भ चेअरमन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.