राजुरा
राजुरा शहरातील जवाहर नगर वॉर्डातील रहिवाशी विलास वासाड, वय ५८ यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विलास वासाड हे बल्लारपूर येथील सर्वोदय विद्यालय येथे शिक्षक असून दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते.
वासाड हे दिनांक ८ जानेवारीला सकाळी घरी असलेल्या समोरच्या रूम मध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. बेडरूम मध्ये झोपलेल्या पत्नीला सकाळी ही बाब निदर्शनास आली. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत अधिक तपास सुरू केला आहे. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.