श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चंद्रपूर,दि.०८/०१/२०२३
त्याकाळातील पञकारिता आणि आताच्या पञकारितेचे स्वरूप बदलले असुन समाज घडविण्यात वृत्तपञाची महत्वाची भुमीका आहे. जनता आणि पोलीस यामधील दुवा म्हणुन काम करणाऱ्या वृत्तपञाच्या माध्यमातुन मी घडलो. अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेसी यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हा व्हाँईस ऑफ मीडियाच्या वतीने स्थानिक होटल सिध्दार्थच्या सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार दिन आणि पत्रकार विमा पॉलिसी शुभारंभ कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक बोलत होते.
ज्येष्ठ पञकार सुनिल कुहीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेसी, व्हाँईस आँफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे सह सत्कारमुर्ती ज्येष्ठ पञकार वसंत खेडेकर, यशवंत डोहणे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे आणि लोकमतचे नागपूर शहर मुख्य प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी दीप प्रज्वलन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून व्हाँईस आफ मीडियाच्या प्रतिनिधींना दहा लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे वितरण आणि ओडखपञाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कहीकर यांनी वर्तमानपत्रातील बदलते स्वरूप पत्रकारासमोर मांडले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यांच्यातील भेद उलघडून दाखवतांना मीडियातील बदलत्या स्वरूपाचा पञकारांनी स्विकार करावा. असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ पञकार सुनिल कुहीकर आणि जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेसी यांचे हस्ते वसंत खेडेकर, गोपालकृष्ण मांडवकर, यशवंत डोहणे आणि संजय तायडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती वसंत खेडेकर, गोपालकृष्ण मांडवकर आणि संजय तायडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी व्हाँईस आँफ मीडीयाच्या स्थापनेमागील भुमीका विषद करतांना संघटनेच्या पंचसुञीवर प्रकाश टाकला. जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे संघटक विनायक रेकलवार यांनी संचलन आणि अमर बुध्दारपवार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारीणी पदाधिका-यांसह तालुकाध्यक्ष आणि तालुका कार्यकारीणी सदस्य व जिल्हातील पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.