श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
हनुमान वार्डातिल पाणी टंचाईवर तोडगा काढा-समाजवादी पक्षाने केला नगर पालिकेचा घेराव,
घंटा गाडीच्या मुद्यावर समाजवादी पार्टी आक्रमक तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
देसाईगंज,दि.११/०१/२०२३
देसाईगंज शहरात मागील काही दिवसानपासून कचरा गाडी – घंटा गाडी बंद आहें या मुळे देसाईगंज शहरातील जनतेचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहें या मुळे शहरातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहें संपूर्ण देसाईगंज शहरात संपूर्ण वार्डात मागील काही दिवसानपासून घंटा गाडी बंद आहें तसेच आठ घंटा गाड्या मधून फक्त चार घंटा गाड्या आज पर्यन्त सेवेत होत्या सदर गाड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली देसाईगंज शहरातील हनुमान वार्ड बरड परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहें बरड परिसरात पाण्याची टाकी ना- दुरुस्त आहें तसेच सार्वजनिक नळ बंद पडले आहेंत या परिसरात नवीन सार्वजनिक नळ जोडणी देण्यात यावी सदर पाणी टाकीचि त्वरित दुरुस्ती करावी देसाईगंज शहरात आरोग्याची समस्या लक्षात घेता लवकरात लवकर कचरा गाडी नियमित सुरू करावी अन्यथा समाजवादी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज समाजवादी पार्टी गडचिरोली आणि अल्पसंख्यक विभाग गडचिरोली च्या वतीने नगर पालिकेला दिलेल्या नीवेदनातुन देण्यात आला आहें सदर निवेदन देतांना सपा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इलियास खान, जिल्हा उgपाध्यक्ष आमीर यासिणि, सपा अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष खलील खान, देसाईगंज तालुका महासचिव प्रितम जणबंधू,हाजरा शेख,मुजीब शेख,महेबूब खान, डोमाजि दिव्टे, जीब्राइल शेख,जब्बार शेख,मुन्ना शेख आणि समाजवादी पक्षाचे बहुसंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते,