गोविंदपुर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी भोजराज ज्ञानबोनवार यांची अविरोध निवड

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

तळोधी बा,दि.११/०१/२०२३

नागभीड तालुक्यातील पाच ग्रामपंचायत च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गोंविदपूर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी काँग्रेस चे शालुताई हांडेकर व ११ सदस्य काँग्रेस शिवसेना समर्थीत असलेले निवडून आलेले होते. आज उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात महा विकास विकास आघाडी समर्थीत व नागभीड तालुका शिवसेना प्रमुख (उध्दव ठाकरे गट) भोजराज ज्ञानबोनवार यांची अविरोध पणे एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नागभीड चे नायब तहसीलदार भानारकर साहेब यांनी कामकाज बघितले. यावेळी नवनिर्वाचित झालेल्या उपसरपंच चे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.