माता पित्याची सेवा चा आदर्श प्रभू श्रीराम कडून घेण्यासारखा आहे – अजय चौहाण

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधि,गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर

कोरची,१०/०१/२०२३

विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न बनण्यासाठी एक आदर्श मुलगा बनण्यासाठी प्रभू श्रीरामाची विचार आचरणामध्ये आणावे की ज्यामुळे एक मुलगा आपल्या माता-पित्यांची कशी सेवा करू शकतो याचा आदर्शवाद प्रभू श्रीराम कडून घेण्यासारखा आहे असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटन मंत्री अजय चौहाण नागपूर हे कोरची येथील श्रीराम विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते
पुढे बोलताना याबरोबरच गुरु ला केंद्रस्थानी मानून आपले जीवन व्यतीत केल्यास कार्यसिद्धी होते गुरुचा महिमा व्यक्त करताना एक उदाहरणादाखल सीता स्वयंवर मध्ये उचललेला बाण हा गुरुचे स्मरण करून उचलला यामध्ये त्यांना सीतेला जिंकायचं नव्हतं तर गुरूला दिलेला शब्द पूर्ण करायचा होता म्हणून बाल उचलताना गुरुस्मरण केला व स्वयंवर जिंकला यात गुरु महिमा व्यक्त केली यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्येक स्पर्धेत यश अपयश ,ठरलेलं असतं. परीक्षकांना नंबर द्यायचे असतात. ज्यांना अपयश आलं त्यांनी पुन्हा नव्या जोमाने पुढच्या स्पर्धेसाठी सज्ज व्हायचे आहे असे उद्घाटक स्थानावरून बोलत होते
श्रीराम विद्यालयाच्या स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यासोबत निती आयोग भारत सरकार यांच्या आर्थिक साहाय्य निधीतून प्राप्त वछलाबाई मोरेश्वर फाय अटल टिकंरिगं लॅबचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी वामनराव फाये अध्यक्ष श्रीराम विद्यालयाच्या शाळा समिती, उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे,दोषहर फाये, डॉ शैलेंद्र बिसेन नगरसेवक, आंनद चौबे , चांगदेव फाये ,नागेश फाये,प्रवेक्षक नंदू गोबाडे, राहुल अंबादे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देवराव गजभिये यांनी केले तर संचलन प्रा वसंतराव बांगरे आभार प्रा राजेंद्र ठाकरे यांनी मानले आहेत