बौद्ध समाज सामुहिक विवाह सोहळा 16 एप्रिल ला.

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधि,गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची,दि.११/०१/२०२३

भिमपूर येथे बौद्ध समाजाची सभा.

इथून 5 किमी अंतरावर असलेल्या भिमपूर येथील युवास्पंदन विद्यालयात बौद्ध समाजाच्या भिमपूर शाखेची सभा 7 जानेवारी ला सुदाराम सहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत कोरची तालुक्यात पहिल्यांदा च बौद्ध समाजाचे सामुहिक विवाह कार्यक्रम 16 एप्रिल रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले.

सामाजिक, धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या बौद्ध समाज एकत्र आणण्यासाठी तालुक्यातील काही लोक मागील चार महिन्यापासून काम करीत आहेत.
भौगोलिक दृष्ट्या या तालुक्याचे सहा भागात विभाजन करण्यात आले आहे.त्याला शाखा असे म्हटले जाते. कोटगूल,कोचीनारा,कोरची,जामणारा, भिमपूर आणि मसेली.प्रत्येक शाखेत सभा घेण्याचे ठरविण्यात आले असून सामुहिक विवाह कार्यक्रमात जास्तीत जास्त जोडपे सहभागी व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
दुसर म्हणजे, या तालुक्यात बौद्ध समाजाचे नव हजार लोक आहेत. चार हजारापेक्षा जास्त बौद्ध मतदार आहेत. ही संख्या तालुक्यात राजकीय गणित जुळविण्यासाठी खासमखास आहे.
त्यासाठी तालुक्यातील सहाही शाखेतील लोक कामाला लागले आहे.
या सभेत संपूर्ण बौद्ध समाज एकाच छत्राखाली येण्याचे ठरविण्यात आले. कुणी कोणत्याही पक्षात काम करीत असले तरी ते बौद्ध समाजाच्या मुख्य लोकांनी ठरवून दिलेल्या पक्षासोबत काम करण्याचे ठरविण्यात आले.

या सभेत बौद्ध समाजाचे तालुकाध्यक्ष नकुल सहारे, सचिव शालीकराम कराडे, कोटगूल शाखेचे अध्यक्ष उमरे, उपाध्यक्ष अंताराम टेंभुर्णे, भिमपूर शाखा अध्यक्ष महेश लाळे, कोचीनारा शाखाध्यक्ष सुदाराम सहारे, जामनारा शाखेचे हरिश्चंद्र उंदिरवाडे, मसेली शाखाध्यक्ष माणिक राऊत आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.