स्वतःच्या घरी युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 

गडचिरोली,दि.११/०१/२०२३

शहरातील इंदिरानगर येथे स्वतःच्या घरी युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना बुधवार ११ जानेवारी रोजी दुपारी ०१:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विनोद कुनघाडकर (28) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती, पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही, शवविच्छेदन अहवाला नंतरच कारण कळू शकणार आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.