चामोर्शी- जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार येथील नगरपंचायत वतीने शहरांमध्ये ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज १० ऑगस्ट रोजी सर्व शाळांच्या विद्याथ्र्याची” घर घर तिरंगा” जनजागृती रॅली काढण्यात आली
यावेळी नगराध्यक्षा जयश्री वायलालवार ,उपाध्यक्ष लोमेश बुरांडे , सभापती सुमेध तुरे,नगरसेवक आशिष पिपरे , गीता सोरते , स्नेहा सातपुते, रोशनी वरघंतटे, सोनाली पिपरे,निशांत नैताम, दिलीप चलाख , साईनाथ बुरांडे ,जयराम चला ख ,विलास चरडुके , शंकर साखरे ,पोषक गेडाम , गुरुदेव सातपुते , गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्र प्रमुख हिंमतराव अभारे, प्राचार्यकरामकृष्ण ताजने, प्रभारी प्राचार्य संजय चांदेकर, मुख्याध्यापकअरविंद भांडेकर, प्राचार्य श्याम रामटेके, पोलिस विभागाचे कर्मचारी व नगर पंचायत कार्यालयीन कर्मचारी , गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेला उ . शहरातील संपूर्ण शाळा , कनिष्ठ महाविद्यालय , वरिष्ठ महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था या रॅलीत सहभागी होत शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढण्यात आली
चामोर्शी नगरपंचायत प्रशासनाकदून १६ अगाष्ट पर्यंत प्रास्ताविक वाचन ,हुतात्मा स्मारक स्वच्छता ,सुशोभीकरण , क्रांती दिन साजरा करणे. बालगोपाल महोत्सव , महिला मेळावा ,चामोशी शहरात तिरंगा रॅली , बेस्ट फॉर्म वेस्ट ( राखी ) , निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा , स्वच्छता रॅली , पंतप्रधान आवास योजना मार्गदर्शन मेळावा . सेल्फी विथ तिरंगा , प्रभात फेरी व वीर पुरुषांची माहिती. माजी वसुंधरा शपथ , व्यसनमुक्ती पथक ,मार्कंडादेव येथे पदयात्त्रा वृक्षारोपण कार्यक्रम ,पर्यावरण संवर्धन शपथ व विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणआदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत .