गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
धानोरा,दि.२१/०१/२०२३
धानोरा तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत धानोरा उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत येत असलेल्या ११धान खरेदी केंद्राना खरेदी करण्याचे उद्दिष्ट १५८०००क्विटल दिनांक ३१जानेवारी २०२३पर्यन्त दिलेले आहे.त्यामुळे वेळेत शेतकऱ्यांचे धान्य खरेदी होणार की नाही याची शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये घोंगावत आहे.
धानोरा उपप्रादेशिक केंद्रा अंतर्गत तालुक्यातील अकरा केंद्राचा समावेश होतो.त्यात धानोरा,मुरुमगाव,रांगी , दुधमाळा,कारवाफा,मोहलि,सोडे,चातगाव,सुरसुंडी,पेंढरी,गट्टा,या धान खरेदी केंद्राचा समावेश होतो.या वर्षीचा पाणी, पाऊस आणि उत्पादन लक्षात घेऊन शासनाने संपूर्ण तालुक्या करिता १५८०००येवढे आहे त्यात धानोरा tdc( ११८१०), मुरुमगाव tdc(२६१९६),रांगी (१६९६७),दुधमाळा (१०७०५),कारवाफा (१५१६८), मोहलि (१६४१३), सोडे (१३२८६), चातगाव (१४७९७), सुरसुंडि (१४१३६) पेंढरी tdc (१३५८७) गट्टा (३८८१) येवढे उद्दिष्ट ठरवून दिले आहेत.