चामोर्शी:- स्थानिक जा क्रु बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दि. ९ऑगस्ट २२ ला जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य- श्री.इतेंद्र चांदेकर, प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक श्री.संजय खाडे, श्री.नंदकिशोर मेनेवार, श्री.संजय भुरभुरे, श्री.खुशाल कापगते , स. शि.श्री. महेंद्र किरमे,स. शि. श्री.अशोक गजभिये, लिपीक श्री.राजू कुनघाडकर आदि मान्यवर व विदयार्थी उपस्थित होते.
मान्यवरांनी अध्यक्ष व अतिथींनी महात्मा गांधी जी व शहिद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. उपस्थितांनी पुष्पार्पन केले.
मान्यवरांनी महात्मा गांधी जी व शहिद बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
संचालन श्री-घनश्याम मनबतुलवार यांनी तर आभार प्रदर्शन, श्री आनंदराव साेनकुसरे यांनी मानले.