भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील लाहेरी टोला येथील किशोर कुडयामी, (वय 23 वर्ष), या युवकाची ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी रात्री दरम्यान बंदुकीची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे,
किशोर कुडयामी हा काही दिवसांपूर्वी पोलीस भर्तीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी गडचिरोली येथे गेला होता तोच राग ठेऊन नक्षल्यांनी त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे, नक्षल्यांनी हत्येनंतर किशोर कुडयामी याचा मृतदेह लाहेरीच्या पोलीस मदत केंद्रा जवळ आणून टाकला होता, हे विशेष!