गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भामरागड ता ०५/०२/२०२३
तालुक्यातील साधना विद्यालय जिंजगावच्या वतीने विद्यार्थी व पालकसाठी फन अण्ड फुड फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता.
लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा संचालित साधना विद्यालय जिंजगाव येथे ०३ फेब्रुवारी २०२३ ला विद्यार्थी व पालकसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.तद्नंतर गावाजवळील अरण्यात मामा तलावाचे परिसरात फुड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले.यामध्ये परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतः तयार केलेल्या ५७ प्रकारच्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. यामध्ये मुंग्यांची चटणी,कुळीथ भात,सुरण काप,कुळीथ वडे,दुधी वडे, साबुदाणा वडे,मसाले भात,मेथीचे पराटे, तांदळाचे थालीपीठ,खीर,नाचणी डोसा,नाचणी ईडली,नाचणी खीर, विविध प्रकारच्या चकल्या,अंबाडी शरबत,भजी,चिंचेचे विविध पदार्थ, तांदूळ पोळी,भोपळा बोंड,आलूबोंडा,येमिलझब्बा भाजी इत्यादी ५७ प्रकारच्या खाद्यपदार्थांचा फुड फेस्टिव्हलमध्ये समावेश होता.
सदर फुड फेस्टिव्हलला भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे,संवर्ग विकास अधिकारी स्वप्निल मगदुम, नगरपंचायत भामरागडचे मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सिताराम मडावी, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे,आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे
इत्यादी मान्यवरांनी भेटी देऊन विविध खाद्यपदार्थांची चव चाखली व परिसरातील पालकांचे अभिनंदन केले.विशेष म्हणजे फुड फेस्टिव्हलमध्ये प्लॉस्टिकचा वापर न करता झाडांच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण यांचा वापर करण्यात आला होता.
सांस्कृतिक कार्यक्रम व खेळात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व पालक यांना जेष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे यांचे हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रेणुका मनोहर,अमित कोहली,शिल्पा चांगण,अशोक चापले, प्रफुल्ल पवार,भाऊजी मडावी, नामदेव चिमुरकर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाला परिसरातील १००० ते १२०० नागरिक उपस्थित होते.