अपघातातील दोन्ही वाहन पकडण्यात तळोधी पोलिसांना यश. पोलिसांच्या कारवाई चे कौतुक

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

सावरगाव,दि.०५/०२/२०२३

तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे मूल & नागपूर हायवेवर असलेल्या सावरगाव येथे येत्या महिन्याभरात सतत तीन अपघात होऊन गावातीलच तीन व्यक्ती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे परिसरात संतापाचा वातावरण निर्माण झाला होता तर 12 जानेवारी ला अपघातात बस स्टॉप वर मृत्यू पावलेला कैलास मांढरे वय 35 याचा अपघात करून फरार झालेला टिप्पर पकडण्याची मागणी करीत सावरगाव येथील लोकांनी तर तब्बल अडीच ते तीन तास मूल – नागपूर रस्ता जाम करून ठेवलेला होता. मात्र तळोधी पोलिसांनी रात्री फरार झालेला अपघातातील गुन्हेगार हायवा (एम एच 40 बी जी 5834) याला सीताफिने शोधून काढून पो. उप निरीक्षक सहदेव गोवर्धन, व ना.पो. अंमलदार हंसराज सिडाम, यांनी ट्रक चालकाला अटक करून पोलीस स्टेशनला जमा केले त्यामुळे परिसरातील लोकांनी त्यांचे कौतुक केलेले आहे.
याआधी सुद्धा 18 डिसेंबरला सावरगाव येथेच अपघातात सेवकराम सावरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा धडक देऊन फरार झालेल्या गाडीला वाहन क्रमांक (एम एच 34 बी झेड 1822) ही चालका सकट शोधून पोलिसांनी सखोल तपास करून मेहनतीने व शितापीने पकडून तिला सुद्धा तळोधी पोलीस ठाण्यामध्ये जमा केले. ही शोध मोहीम सहा.उप पोलीस निरीक्षक संजय मांढरे,व पो. अंमलदार मनीष गेडाम, यांनी या दोन्ही फरार झालेल्या गाड्यांना मोठ्या शितापीने पकडण्यात तळोधी पोलिसांना यश मिळविले. हे दोन्ही तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनकर शेंडे यांच्या मार्गदर्शनात करन्यात आले.
मात्र या दुसऱ्या गुन्ह्यातील टिप्पर चालक हा सावरगावच्या थोड्यासमोर जाऊन जंगली रस्त्याने पडून गेलेला होता. व विशेष म्हणजे या टिप्पर च्या मागच्या बाजूला नंबर प्लेट नव्हती त्यामुळे बस स्टॉप वर घटनास्थळी लोक असून सुद्धा त्या टिप्परच्या मागे नंबर प्लेट नसल्यामुळे त्याला पकडायला अगदी पोलिसांना कडी मेहनत करावी लागली. यावरून परत एकदा नागपूर – उमरेड – भिवापूर – नागभीड हायवेने सिंदेवाही किंवा ब्रह्मपुरी कडे जाणारे व रात्र रेतीची तस्करी करत रेती भरून जाणारे 100 पैकी 80 टक्के ट्रक/ टिपऱ्यांना नंबर प्लेट नाही. तरीही नागपूर आरटीओच्या दुर्लक्षितपणामुळे भिवापूर -उमरेड -नागपूर मार्गाने येऊन ब्रह्मपुरी कडे किंवा सिंदेवाही कडे येतात व रात्रोला इकडच्या नदी घाटांवरून रेती भरून रेतीची तस्करी करून परत जातात व यामध्ये रस्त्यात अपघात करून स्थानिक पोलीस व नागरिकांना चकमा देऊन मागे नंबर प्लेट नसल्यामुळे पळून जातात पळून जाण्या यशस्वी होतात मात्र त्यांना पकडण्याकरता स्थानिक पोलिसांना मोठी दमच्या करावी लागते तरी नागपूर हायवेवरील आरटीओ पोलिसांनी हायवे पोलिसांनी अशा बिना नंबर प्लेटच्या ट्रक टिप्पर वर कारवाई करून यांची वाहतूक बंद करावी जेणेकरून अपघातावर काही प्रमाणात आळा घालता येईल व गुन्ह्यातील ट्रक टिपऱ्यांना तात्काळ अटक करता येईल असे स्थानिक पोलिसांनी म्हणाले आहे तरी पोलिसांनी घेऊन शोध घेऊन सावरगाव अपघातातील फरार टिप्परला अटक करून पोलीस स्टेशनला जमा केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे सोबतच रात्रीच्या अंधारात सावरगावातील एका इसमाला धडक देऊन फरार झालेल्या नवरगाव येथील वाहनाला हळदी पोलीस स्टेशनला जमा केल्यामुळे सुद्धा त्यांची तारीफ केल्या जात आहे कौतुक केल्या जात आहे या तपासात असलेले मनीष गेडाम, संजय मांढरे, हंसराज सिडाम, सहदेव गोवर्धन यांनी डि. आर. शेंडे पोलीस सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली.