सामाजिक युवा कार्यकर्ती कु. अँड प्रतीक्षा अरुण देऊळकर यांचा सत्कार

Adv.Pratiksha-Deulkar-awarded-by-Prabhu-Vishvakarma-Panchal-Sutar-Bahuddheshiya-Vikas-Mandal-Chandrapur
Adv.Pratiksha-Deulkar-awarded-by-Prabhu-Vishvakarma-Panchal-Sutar-Bahuddheshiya-Vikas-Mandal-Chandrapur

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

चंद्रपूर,दि.०४/०२/२०२३

३ फेब्रुवारी  हा दिवस भगवान विश्वकर्मा जयंती म्हणुन साजरा करण्यात येतो  या दिनाचे औचित्य साधून प्रभू विश्वकर्मा पांचाळ सुतार बहुउद्देशीय विकास मंडळ चंद्रपूर तर्फे युवा सामाजिक कार्यकर्ती , सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय, सांस्कृतिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान चिन्ह प्रधान करण्यात आले आहे समाजात समानता बंधुता, राष्ट्रीय अखंडता टिकवण्यासाठी जागृत प्रहरी म्हणून सदैव सक्रिय कार्य करत असणारे तसंच निस्वार्थी समझा साठी कार्य करत असणारे ,कार्यासाठी तळमळ अनुभवाचा लाभ प्रबोधक कार्यात कार्य करत असतात म्हणून प्रभू विश्वकर्मा या पंचाळ सुतार बहुउद्देशीय विकास मंडळ चंद्रपूर तर्फे वकिलाच्या हाताने वकिलाचा सत्कार करण्यात आला आहे , एड. वसंत खोलगडे (बीकॉम एम एस डब्ल्यू ,एम फिल, सी ए एल एल बी ,सीडीसी अंड ए, एम ए (वेदांग ज्योतिष ), डीप इन वास्तु , एलएलबी , एल एल एम बिझनेस लॉ व कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर चे चीफ एक्झिटिव्ह ऑफिसर, माननीय श्री.वसंत खोलगडे सर यांच्या हस्ते सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कुमारी एडवोकेट प्रतीक्षा अरुण देऊळकर,सदस्या ग्राम पंचायत माथोली (जुगाद) यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. News Jagar

३ फेब्रुवारी ला विठ्ठल मंदिर देवस्थान चंद्रपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रभू विश्वकर्मा पांचाळ सुतार बहुउद्देशीय विकास मंडळ चंद्रपूर चे अध्यक्ष देविदास आष्टणकर ,प्रमुख पाहुणे म्हणून श्री.वसंतराव खोलगडे ,श्री.कृष्णकांत खानझोडे होते,मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.अशोकराव राजूरकर ,सचिव श्री.हरिभाऊ वानखडे , उपाध्यक्ष श्री.मनोज तांबेकर, सहसचिव श्री.जयंतराव खंडाळकर,कोषाध्यक्ष श्री.वसंतराव येनकर , श्री.अजय ईश्वरकर ,श्री.दिलीप पुसदकर,श्री.नंदकिशोर खेडकर,श्री.सुनील बोरकर,श्री.दीपक टवलारकर इत्यादी मंडळाचे सदस्य आणि नागरिक होते. Social Worker Adv.Pratiksha Deulkar awarded by prabhu vishvakarma panchal sutar bahuddheshiya vikas mandal chandrapur

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हरिहर येलकर यांनी केले, सूत्र संचालन श्री.अनिल नानोटकर यांनी केले तर सौ क्षमा अनिल नानोटकर यांनी सर्वांचे आभार मानले