बाजाराच्या मध्यभागी शौचालय बांधकाम करणाऱ्या सरपंचावर कारवाई करा – पत्रकार परिषदेतून ग्रा.पं. सदस्यांची मागणी

AAMGAO-MEMEBERS-DEMAND-A-CANCLELLATION--OF-TOILETS
AAMGAO-MEMEBERS-DEMAND-A-CANCLELLATION--OF-TOILETS

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी,दि.०६/०२/२०२३

पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या आमगाव महाल येथील सरपंचाच्या मनमानी निर्णयामुळे बाजाराच्या मध्यभागी शौचालय बांधकाम करण्यात येत असल्याने अशा मुजोर सरपंचावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून ग्रा.पं. सदस्यांनी केली आहे .
शौचालय बांधकाम करीत असलेली जागा ही जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगणाकरिता राखीव आहे तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकीचे बांधकाम झालेल्या जागेला लोखंडी वॉल कंपाऊंड बांधकाम करणे आहे व याआधी त्या ठिकाणी असलेला मोठा गड्डा जून 2022 मध्ये हा 15 ते 20 फूट माती भरम भरून भरून सपाटीकरण करण्यात आले आहे त्यामुळे या जागेवर कोणतेच बांधकाम करू नये असे असताना व ग्रामपंचायतच्या नमुना आठ मध्ये सदर जागा ही जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगण साठी दिलेली दाखवली असताना सुद्धा सरपंचांनी कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता जाणून बुजून भरम भरलेल्या खड्ड्यामध्येच कोणत्याही लेआऊट न मागवता सरपंच व सरपंच मॅडमचा नवरा आपल्या मनमर्जीने संडास बांधकामाचा उपक्रम हाती घेतल्यामुळे व बाजाराच्या मध्यभागी असल्यामुळे नाहक गावकऱ्यांना त्रास होतो आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून बांधकामाला स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत आमगाव ( म) चे सदस्य निकेश जुवारे, सुभाष कोठारे , भाऊराव देवतळे ,वैशाली आदे, आणि निर्मलाबाई वासेकर यांनी पत्रकार परिषदेतून मागणी केलेली आहे.