श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा , न्यूज जागर
कोरची,दि. १५/०२/२०२३
२३ नागरिकांनी केला रक्तदान कोरची पोलीसांचा सुप्त उपक्रम
13 फेब्रुवारीला पोलीस स्टेशन कोरची येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसु, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली “भव्य आरोग्य” मेळावा, ऑपरेशन रोशनी शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून आर. एम. फाये संवर्ग विकास अधिकारी पं स कोरची, तसेच उदघाटक म्हणून गणेश सोनवानी नायब तहसिलदार कोरची, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून एल. ए. कटरे मंडळ कृषी अधिकारी कोरची, सातपुते ग्रा रु कोरची, डॉ. मनोहरे नेत्र चिकित्सक ग्रा रू कोरची, व्यसनमुक्ती तालुका संघटक नीळा किन्नाके व इतर विविध अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आर एम फाये गट विकास अधिकारी यांनी “पोलीस प्रशासन आदिवासी भागात करत असलेल्या कामांबाबत महत्त्व पटवून दिले.
सदर आरोग्य मेळाव्याचे औचित्याने पोलीस स्टेशन कोरची विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पप्पू सिन्हा, दामोधर पटेल सचिव ग्रामपंचायत कोचिनारा, रूपराम देवांगन उपसरपंच, तुलसी अंबादे, रवी बावणे, निलेश धकाते, शेडमाके सचिव मुरकूटी, मिलिंद पिल्लारे, मंगेश गुरणूले, निखिल दाने, कैलाश जेगठे, निकेश कंनाके, ज्ञानेश्वर जेंगठे, खुशाल मोहुर्ले, देवेंद्र आकणुरवर, वैभव घासले, टेमलाल देवांगन, आशिष अग्रवाल, कुणाल झाडे, शुभम मसराम, गौरीशंकर कोचिनारा, रूपराम देवांगन उपसरपंच, तुलसी अंबादे, रवी बावणे, निलेश धकाते, शेडमाके सचिव मुरकूटी, मिलिंद पिल्लारे, मंगेश गुरणूले, निखिल दाने, कैलाश जेगठे, निकेश कनाके, ज्ञानेश्वर जेंगठे, खुशाल मोहुर्ले, देवेंद्र आकणुरवर, वैभव घासले, टेमलाल देवांगन, आशिष अग्रवाल, कुणाल झाडे, जितेंद्र सहारे, शुभम मसराम, गौरीशंकर मरसकोल्हे, करंगुलवार जे. ई. सिंचाई विभाग असे एकूण 23 नागरिकांनी रक्तदान केले.
सदर आरोग्य मेळाव्यामध्ये पोलीस दादालोरा खिडकी व आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून खालील सुविधांचा लाभ देण्यात आला. ज्यामध्ये ब्लडप्रेशर चेकअप- 48, शुगर चेकअप- 24, रक्त तपासणी -29, नेत्र तपासणी – 34, आयुष्य मान भारत कार्ड -13, विवाह नोंदणी 04, घरकुल प्रस्ताव- 07, जॉब कार्ड-08, पॅन कार्ड-06, आधार अपडेट- 48, राशन कार्ड प्रस्ताव- 03, बँक खाते प्रस्ताव-07 आदी देण्यात आले. Korchi Police
सदर आरोग्य मेळाव्यात प्रभारी अधिकारी गणेश फुलकवर यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार व्यक्त केले. व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान केले, जिल्हा पोलीस अंमलदार , महीला पो. अंमलदार तसेच SRPF अधिकारी व अमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. सदर आरोग्य मेळाव्यामध्ये एकूण 200 च्या जवळपास नागरिक उपस्थित होते. NewsJagar
सदर कार्यक्रमाचे संचालन ठाकरे मेजर यांनी तर प्रास्ताविक पोलीस स्टेशन कोरची येथील प्रभारी अधिकारी गणेश फुलकवर यांनी केले.