आज दिनांक 20 फेब्रुवारी ला शिवाजी मंडळ रामाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे अनावरण 

inauguration-of-shivaji-maharaj-statue

चामोर्शी तालुका प्रतिनिधी

चामोर्शी दि.२१/०२/२०२३

वीर शिवाजी मंडळ रामाळा यांचे वतीने शिवाजी चौक येथे राजे शिवछत्रपती यांचे पुतळ्याचे अनावरण मा विजयभाऊ वडडेट्टीवार माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा यांचे हस्ते करण्यात आले,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नामदेव उशेंडी माजी आमदार तथा प्रदेश अध्यक्ष आदीवासी विभाग,प्रमुख उपस्थित श्री मनोहर पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, सौ चंदाताई कोडवते प्रदेश सचिव, यांचे हस्ते पार पडले, यावेळी मंचावर, श्री प्रमोद भगत तालुका अध्यक्ष काँग्रेस कॅमेटी चामोर्शी, श्री प्रभाकर वसेकर, पांडुरंग घोटेकर,मा जाधव सर ,कविता भगत जी प सद्स,वैशाली ताटपलीवर जी प सद्स,लोमेश बुरांडे उपाध्यक्ष नगर पंचायत चामोर्शी, नितीन वायलालवार नगरसेवक,राजेश ठाकूर अध्यक्ष पर्यावरण विभाग ,वैभव भिवापुरे बांधकाम सभापती नगरपंचायत, सुमेद तुरे सभापती,विजय कोरेवर माजी सभापती सावली,निकेश गदेवार,दिगंबर धानोरकर,सरपंच,जया सातपुते सरपंच दोतकुली, धर्मशीला सहारे, वामन राव सावसागडे, अब्दुल पंजावणी, मुद्द्मवार साहेब,रवी पाल उपसतंच रामाळा उपस्थित होते,यावेळी मा विजयभाऊ यांनी छत्रपती शिवराय यांचे जीवनावरील प्रसंग आणि आजचे युग यावर मार्गदर्शन केले,तसेच लोडशेडिंग व महागाई व यावर विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले,  डॉ नामदेव उशेंडी यांनी यांनी शेतकऱ्यांना चीचडोह चे पाणी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे यासाठी लबकरच मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला दिला,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद भगत तालुका अध्यक्ष यांनी तर संचालन प्रा गोकुळ झाडे यांनी केले. newsjagar
यावेळी मंडलाचे अध्यक्ष किशोर चुदरी सचिव गणेश झाडे,उपाध्यक्ष मंगेश मंगर, रवी पाल मुरली पाल,गुरुदास घोगरे,राजू लांबाडे,नरेंद लांबाडे व सर्व मंडळ यांनी पाहुण्यांचे स्वागत,गावातील व पाहूने याना जेवण याची व्यवस्था केली,
गावातील महिला व पुरुष भगवे वस्त्र धरून करून व पाहुण्यांवर फुलांची उधळन करीत गावातून वाजत गाजत फेरी काढून शिवउत्सव साजरा केला