चामोर्शी तालुका प्रतिनिधी
चामोर्शी ,दि.२४/०२/२०२३
विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ निर्माण यात्रा २१ फरवरीला कालेश्वरवरून प्रचार यात्रा निघून २२ फरवरीला चामोर्शी येथे जनजागरण करण्याकरिता बस स्थानकवर दाखल होताच चामोर्शी तालुका विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष आशोक पोरर्ड्डीवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले
विदर्भ निर्माण यात्रा २१ फरवरी रोजी कालेश्वर वरून अहेरी, आलापल्ली,, मुलचरा, आष्टी मार्गे चामोर्शी येथे २२फरवरी रोजी दुपारी तीन वाजता बस स्टंड वर येताच विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष अशोक पोरेडीवार यांच्या नेतृत्वात किशोर ओल्लालवार, , ता.अध्यक्ष कृष्णा नैताम, दिलीप चिताकर ,विनायक सातार, मोरेश्वर चलकलवार, बाबुराव भोवरे, प्रकाश सहारे, दिनकर लडके, राजेश राहुलवार, गणेश नैताम, आदींनी जंगी स्वागत केले.newsjagar
त्यानंतर जनजागरण कॉर्नर सभा घेण्यात आली त्यावेळी विदर्भ आंदोलन समितीचे प्रवर्तक तथा पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार यांनी राज्यकर्त्यांनी अद्याप पर्यंत विदर्भ राज्य होण्याला विरोध केल्याने विदर्भ निर्माण झाला नाही त्यामुळे विदर्भातील बेरोजगार अद्यापही नौकरी पासून वंचित आहेत तर शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ व , विदर्भात मुबलक वीज निर्मिती होते मात्र विदर्भातील जनतेला विजेचा लाभ मिळत नाही त्यासाठी वेळीच जागरूक होणे गरजेचे असल्याचे सांगितले तर विदर्भ प्रदेशचे युवा आघाडी अध्यक्षा मुकेश मासुरकर यांनी विदर्भात मुबलक खनिज उपलब्ध आहे मात्र त्या खनिजाचा लाभ विदर्भाबाहेर होतआहे त्यामुळे विदर्भावर अन्याय होत आहे तर सर्वांना आवश्यक असणाऱ्या दुधावर सुध्धा GST लावल्या जात आहे हा अन्याय असून असे अनेक प्रश्न उपस्थित करत जनेतेनी “अभी नही तो कभी नहीं” म्हणून या लढाईत सामील व्हावे असे भावनिक आवाहन केले या यात्रेतमाजी मंत्री रमेश गजभे, सुधाताई पावडे, ज्योती ताई खांडेकर, अशोक पाटील, तात्यासाहेब मत्ते, सुधाम राठोड शोभाताई येवले, नरेश निमजे, माधुरी ताई चैवान, मनीषा फुडें, विना भोयर , अरविंद भोसले आदी उपस्थित होते . अशोक पोरेडीवार यांनीही विदर्भ निर्माण यात्रेचे स्वागत प्रसंगी मार्गदर्शन केले याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.