योगेश रामटेके ,प्रतिनिधी ,न्यूज जागर
सावली,दि. २४/०२/२०२३
रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या वतीने संत शिरोमणी गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मान. के.एन.बोरकर साहेब, तसेच संस्था सचिव मान.विशाखा चंद्रकांत गेडाम मॅडम, प्राचार्य एन एल.शेंडे,एम.डी.लाकडे सर पि.एस.वरारकर सर,आर.पी. चौधरी सर उपस्थित होते.प्रथम गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तद्नंतर आपल्या मार्गदर्शनात लाकडे सर यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतांना आपल्या विचारात जी अस्वच्छतेची घाण पसरली आहे,ती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ विचारांची चार्जिंग करावी लागेल.तसेच प्राचार्य शेंडे सर यांनी आपल्या भाषणात देव दगडात नसून तो रंजल्या गांजलेल्यांमध्ये शोधावा,तर अध्यक्षीय भाषणातून मान.के एन बोरकर साहेब यांनी अशिक्षित असून सुद्धा शिक्षितांना लाजवेल असा स्वच्छतेचा संदेश संत शिरोमणी गाडगे महाराज यांनी दिला.तो प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकार करावा असे सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.एन. मेश्राम यांनी केले, तर आभार एन एस मेकर्तीवार यांनी केले.newsjagar