श्री.अमित साखरे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली,दि.२८/०२/२०२३
गडचिरोली जिल्ह्यात शिवगर्जना मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद
संकट आणि अडचण यावर मात करण्यासाठी शिवसैनिक नेहमी तत्पर असतो. त्यामुळे तळागाळातील नागरिकांच्या संकटात सर्वप्रथम शिवसैनिक धावून जातो. याचा प्रत्यय प्रत्येकाला आला असून, त्यामुळे सगळे आठवणीने हाक देतात आणि साथ देतात. यापुढे आसाच विश्वास कायम ठेवा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. newsjagar
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. नागपूरनंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथून सुरवात करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रकाश मारावार, युवासेना विस्तारक शरद कोळी, हर्षल काकडे, प्रवक्त्या शिल्पा बोडखे, सुरेश साखरे, किशोर पोतदार, निलेश बेलखेडे, सुरेंद्र चंदेल, महिला आघाडीच्या छाया कुंभारे, डॉ. गोपाळसिंह बछिरे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, विभागप्रमुख सोपान बांगर , प्रशांत डिघुळे, विलास शिंदे आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.